जनाई : पंढरीची माहेरवाशीण
बाई जनाई, तुला माझं एकच सांगणं की, तू निचिंतीनं ऐक. देव तुझा पाठीराखा आहे. लोक काय म्हणतील याची पर्वा न करता देव तुझी कामं बिनबोभाट करीत राहतो. आणिक त्यानं तुला चांगली सांभाळायची म्हणजे करायचं तरी काय गं जनाई? जनाई, विठू देवानं तुझा फार छळ सोसलाय गं. तुझी आईच झालाय तो. खरं ना गं? मग? रुक्मिणी आई तुझ्याएकी देवाला बोलणार नाही असं वाग बाई.......